कै.वा.म. जोशी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने
२१ जानेवारी १९८२. बरोबर १०० वर्षापूर्वी याच दिवशी कुलाबा जिल्ह्यातील तळे या गावी वामन मल्हार जोशी ह्यांच्या रूपाने सौजन्य मूर्त झाले. थोर तत्त्वज्ञ, युगप्रवर्तक कादंबरीकार, निस्सीम सत्योपासक, वाचकांना विचार करावयास शिकविणारे समर्थ अध्यापक, इत्यादी अनेक नात्यांनी वा. म. जोशी आपल्याला परिचित आहेत. परंतु महाराष्ट्रास सर्वाधिक प्रभावित केले ते त्यांच्या सौजन्याने. सौजन्य हा त्यांच्या आचाराचा, विचाराचा, …